शिरूर : इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या उमाजी नाईक यांच्या शौर्याचे त्यावेळच्या ब्रिटीश अधिकार्यांनीही कौतुक केले होते. आपल्या समाज बांधवांना संघटीत करून क्रांतीचा प्रेरणादायी लढा उमाजी नाईक यांनी उभारला. त्यामुळे राजे उमाजी नाईक यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा आणि अन्यायविरूद लढा द्यावा असा मौलाच संदेश देत पोलीस पाटील प्रकाश करपे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले.
इंग्रज सरकार विरोधात सर्वात प्रथम सशस्त्र आंदोलन उभारणारे नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा गावात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील प्रकाश करपे बोलत होते. दरम्यान क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा शिवव्याख्याते आकाश वडघुले, उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिन जाधव, पांडुरंग काळे, प्रविण वडघुले, बाळु जाधव, संदीप जाधव, रवी भंडलकर, मारुती माहुलकर, समीर जाधव, अर्जुन जाधव, संतोष चव्हाण, अजय भंडलकर, भीमराव ढिले, नागेश जाधव उपस्थित होते. तर प्रताप वडघुले यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.