पिंपरी I झुंज न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या हस्ते इतिहासाच्या पानांवर रयतेचा मनांवर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे महान राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवरायांच्या पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शहर कार्याध्यक्ष संजय जाधव यांनी शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचे आवाहन केले.
संभाजी ब्रिगेडने प्रतिवर्षी प्रमाने या वर्षीही शिवरायांची जयंती पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेले ‘शिवचरित्राचे’ तसेच गोविंद पानसरे लिखीत ‘शिवाजी कोन होता’ या पुस्तकांसह अनेक पुरोगामी विचारांच्या पुस्तकांचे वाटप करून शिवरायांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे उपाध्यक्ष नितीन जाधव संघटक विनोद घोडके, मंगेश चव्हाण. गजानन वाघमोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान उपस्थितांना अल्पोपहार व मिठाई वाटप करण्यात आले.