शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून शाळेतील ५ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
या पैकी १ विद्यार्थिनी समृद्धी अविनाश दोरगे २८४ मिळून राज्य गुणवत्ता यादीत सहावी आली. याच विद्यार्थींनीची जिल्हा नवोदय विद्यालय पिंपळे जगताप या ठिकाणी निवड झाल्याची माहिती मुख्याध्यापक एकनाथ सातकर व मार्गदर्शक शिक्षक दत्तात्रय साकोरे यांनी दिली.
जिल्हा गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी व त्यांचे गुण
आरती शेकनाथ काळे (२५४)
समीक्षा गोरख जाधव (२५०)
नंदिनी पांडुरंग काळे (२४४)
आदेश रमेश साकोरे (२१६)
दरम्यान शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशाचे कौतुक सरपंच कोमल माहुलकर, उपसरपंच सविता घोलप, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शरद पाटोळे, मा.पंचायत समिती सदस्य सुनिल वडघुले, रवींद्र दोरगे,नवनाथ काळभोर, प्रकाश कर्पे पाटील,अप्पा वडघुले, विशाल पाटोळे,अश्विनी जाधव,रुबिना शेख,दिपाली राऊत,सोनाली वडघुले, जयश्री साकोरे यांनी केले.