पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारा भा. वी. कांबळे पत्रकार कक्षामध्ये. पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघ व मराठी पत्रकार परिषद सलंग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने. महापुरुषांचे फोटो लावण्यात आले.
ज्येष्ठ पत्रकार सुनील उर्फ बाबु कांबळे, पुणे जिल्हा विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, मराठी पत्रकार संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनिल वडघुले या सर्वांच्या विचारधारेतून महापुरुषांचे फोटो लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
पत्रकार बाबू उर्फ सुनील कांबळे यांनी महापुरुषांचे फोटो पत्रकार संघात दिले व पत्रकार संघाने फ्रेम तयार करून कक्षात महापौर माई ढोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक वृत्तपत्र, सोशल मीडियाचे सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.
यावेळी माई ढोरे यांनी पुरुषांचे फोटो लावण्या संदर्भात आपण त्यांचे विचार आचार आपल्या शहरातील प्रगतीशीलन अर्पण करून या शहराचा विकास घडवूया आणि पिंपरी-चिंचवड शहर हे शिवा,शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराणे निर्माण करूया. असे प्रतिपादन केले.
पुणे जिल्हा विभागीय सचिव बाप्पूसाहेब गोरे यांनी धनवंत्री योजनेसंदर्भात मागणी करत तसेच पत्रकारांच्या हिताय भूमिका पत्राद्वारे महापौर माई ढोरे यांच्याकडे दिल्या. ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे यांनी पत्रकार भवन संदर्भात चर्चा केली. पिंपरी-चिंचवड मराठी पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले यांच्या लेखी पत्राद्वारे पत्रकारांच्या हिताय मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
पत्रकार कक्षात महापुरुषांचे फोटो लावण्याचा आनंद पत्रकारांच्या चेहऱ्यावरती दिसून आला. तसेच मोठ्या आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, दादाराव आढाव, रोहित खर्गे, प्रवीण विनायक लोंढे, विनय गायकवाड, मारुती बानेवार, संतोष जराड, जितेंद्र गवळी, कालींदर मामू शेख, दिलीप देहाडे, दीपक साबळे यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते.