जीवात्मा आणि परात्माचे पूर्णतय: मिलन म्हणजेच योग
नरेंन्द्र वाणी यांचा जन्म सिध्दखेडा गावात (जि.धुळे महाराष्ट्र) १९५१ साली एका साधारण कुटुंबात झाला. निवृत्ती नंतर १९१२ साली ते पुण्यात न्याती एन्वायरन सोसायटी टिंगरेनगरला, विश्रांतवाडी येथे वास्तव्यास आले. वर्ष २०१२ पूर्वी जमीनीवर ते मांडी घालून बसायलाहि असमर्थ होते. मात्र रोज योग करून त्यांनी या संकटावर मात करीत चमत्कार घडवून आणला. व ते आज सदृढ व निरोगी आहेत.
विश्र्वांतवाडी येथे वास्तव्यास आल्यावर त्यांनी सोसायटीतील क्लब हाउस मध्ये होणाऱ्या योगा वर्गात जायला सुरुवात केली. योगा वर्गात नियमित सूक्ष्म व्यायाम, आसन, प्राणायाम, सूर्य नमस्कारचा सराव केला. योगाने जीवनात पुष्कळ परिवर्तन दिसून आले. त्यानंतर शरीर निरोगी आणि तंदरुस्त झाले. सुखासन, पदमासन, वज्रासनात बसायला नरेंद्र वाणी समर्थ झाले.
या योगाचा लाभ सर्वाना घेता यावा यासाठी त्यांनी स्वतः वर्ष २०१४ नंतर योगा वर्ग घ्यायला सुरूवात केली. हा योगा वर्ग रोज सायंकाळी ५ ते ६.१५ या दरम्यान घेतला जातो. तसेच पूर्णतः निशुल्क हा योग वर्ग आहे. दररोज २० ते २५ साधक नियमित योगा वर्गात येत असतात. अनेक शारीरिक आजार कमी झाल्याचे तसेच शरीर तंदरुस्त असल्याची अनेक उदाहरणे या योग वर्गात पाहायला मिळत आहेत .
व्यवस्थित योगा वर्ग घ्यावा तसेच योगा विषयी आधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये डिप्लोमा इन योगा शिक्षण (योग शिक्षक) हि परीक्षा व योगविद्या नाशिक येथील गुरू कुल जी आयुश विभाग भारत सरकार द्वारा मान्य पास केली. त्यानंतर जुलै २०२० मध्ये मिनिस्टि आॅफ आयुश गव्हर्मेट आॅफ इंडिया मान्य योगा सर्टिफिकेट बोर्ड व्दारा योगा वेलनेस इंस्ट्रक्टरची परीक्षा पास केली. या त्यांच्या योग्य अभ्यासाचा नागरिकांना नक्कीच लाभ होणार आहे.
“नरेंद्र वाणी यांच्या मतानुसार योग आपल्या जीवनांशी जुळलेले भौतिक, मानसिक, भावनात्मक, आत्मिक आणि आध्यात्मिक या सर्व विषयांवर सकारात्मक परिणाम करतो. योगाने व्यस्त जीवनशैलीमुळे निर्माण होणारे ताण तनाव दूर होवून मनाला शांती मिळते आणि आत्मा पण शुद्ध बनतो. शरीराचे वजन जास्त असेल तर कमी होते आणि कमी असेल तर वाढून शरीर तंदरुस्त व निरोगी बनते. जीवात्मा आणि परमात्माचे पूर्णतया मिलन म्हणजेच योग. योग करा निरोगी रहा स्वस्थ रहा आनंदी रहा करोना वर मात करा हीच अपेक्षा…!”
भोग भोगवनार भोगी बनत असतो
आज नाही तर उद्या रोगी बनतो
योग ज्याने केला सदा निरोगी राहतो
मोठे मोठे आजारपण सहजतेने निघून जातात…