पाटस I झुंज न्यूज : पाटस येथील आकुबाई बबन आव्हाड(वय ७४) यांचे शनिवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आव्हाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .मोठ्या कष्टाने आकुबाई आव्हाड यांनी कुटुंबाची प्रगती केली. कधीही कोणाला न दुखावता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी आयुष्यात वाटचाल केली .
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परिवार आहे. ईटिव्ही भारत चे दौंड प्रतिनिधी आणि दैनिक पुण्यनगरी चे पाटस येथील बातमीदार सचिन आव्हाड यांच्या त्या आजी होत्या.
-: दशक्रिया विधी :-
दशक्रिया विधी सोमवार (दिनांक १३/०९/२०२१) रोजी सकाळी ९ वाजता पाटस येथील स्मशान भूमी येथे होणार आहे.