“गौरीपुत्र भगवान श्री गणेश हे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय आहेत. जो कोणी गणपतीला प्रसन्न करतो, त्याला सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये गणपतीची विविध नावे प्रचलित आहेत. गणपतींच्या 108 नावांचा जप केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात, असं म्हणतात. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी गणेशाच्या 108 नावांची यादी आणि त्याचा अर्थ घेऊन आलो आहोत.
विघ्नहर्त्याची 108 नावं आणि त्यांचे अर्थ
1. गणाध्यक्ष – सर्व लोकांचे प्रमुख
2. गणपति – सर्व गणांचा प्रमुख
3. गौरीसुत – देवी गौरीचा पुत्र
4. लम्बकर्ण – मोठ्या कानाचा देव
5. लम्बोदर – मोठे पोट असलेला
6. महाबल – अत्यंत शक्तिशाली
7. महागणपति – देवादिदेव
8. महेश्वर – संपूर्ण विश्वाचा स्वामी
9. मंगलमूर्ति – सर्व शुभ कार्याचा स्वामी
10. मूषकवाहन – ज्याचा सारथी उंदीर आहे
11. बालगणपति – सर्वात प्रिय पुत्र
12. भालचन्द्र – ज्याच्या कपाळी चंद्रमा आहे
13. बुद्धिनाथ – बुद्धीचे देव
14. धूम्रवर्ण – ज्याचा रंग धुरासारखी आहे
15. एकाक्षर – एकल अक्षर
16. एकदन्त – एक दात असलेला
17. गजकर्ण – हत्तीसारखे कान असलेला
18. गजानन – हत्तीसारखे मुख असलेला
19. गजवक्र – हत्तीची सोंड असलेला
20. गजवक्त्र – हत्तीसारखे मुख असलेला
21. देवादेव – सर्व देवांमध्ये सर्वोच्च
22. देवांतकनाशकारी – दुष्ट आणि राक्षसांचा नाश करणारा
23. देवव्रत – जो सर्वांची तपश्चर्या स्वीकारतो
24. देवेन्द्राशिक – सर्व देवांचे रक्षण करणारा
25. धार्मिक – दान देणारा
26. दूर्जा – अपराजित देव
27. द्वैमातुर – ज्याला दोन आई आहेत
28. एकदंष्ट्र – एक दात असलेला
29. ईशानपुत्र – शंकराचा पुत्र
30. गदाधर – ज्याचे शस्त्र गदा आहे
31. अमित – अतुलनीय प्रभु
32. अनन्तचिदरुपम – अनंत आणि वैयक्तिक चेतना असलेला
33. अवनीश – संपूर्ण जगाचा स्वामी
34. अविघ्न – अडथळ्यांवर मात करणारा
35. भीम – विशाल
36. भूपति – पृथ्वीचा स्वामी
37. भुवनपति – देवांचा देव
38. बुद्धिप्रिय – ज्ञान देणारा
39. बुद्धिविधाता – बुद्धीमत्तेचा स्वामी
40. चतुर्भुज – चार भुजा असलेला
41. निदीश्वरम – संपत्ती आणि धन देणारा
42. प्रथमेश्वर – सर्व प्रथम देवता
43. शूपकर्ण – मोठे कान असलेला
44. शुभम – सर्व शुभ कार्याचा स्वामी
45. सिद्धिदाता – इच्छा आणि संधींचा स्वामी
46. सिद्दिविनायक – यशाचा स्वामी
47. सुरेश्वरम – देवांचा देव
48. वक्रतुण्ड – वक्र सोंड असलेला
49. अखूरथ – ज्याचा सारथी मूषक आहे
50. अलम्पता – अनंत देव
51. क्षिप्रा – पूजेस पात्र
52. मनोमय – मन जिंकणारा
53. मृत्युंजय – मृत्यूला पराभूत करणारा
54. मूढ़ाकरम – ज्यामध्ये सुखाचा वास आहे
55. मुक्तिदायी – शाश्वत आनंद देणारा
56. नादप्रतिष्ठित – जो नादब्रह्म स्थापित करतो
57. नमस्थेतु – सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवणारा
58. नन्दन – शंकराचा पुत्र
59. सिद्धांथ – यश आणि उपलब्धींचा गुरु
60. पीताम्बर – जो पिवळे वस्त्र धारण करतो
61. गणाध्यक्षिण – सर्व पिंडांचा नेता
62. गुणिन – सर्व गुणांचा ज्ञाता
63. हरिद्र – सुवर्ण रंगाचा
64. हेरम्ब – आईचा प्रिय मुलगा
65. कपिल – पिवळा तपकिरी रंगाचा
66. कवीश – कवींचा स्वामी
67. कीर्ति – प्रसिद्धीचा स्वामी
68. कृपाकर – दयाळू
69. कृष्णपिंगाश – पिवळे-तपकिरी डोळे
70. क्षेमंकरी – क्षमा करणारा
71. वरदविनायक – यशाचा स्वामी
72. वीरगणपति – वीर भगवान
73. विद्यावारिधि – बुद्धीचा देव
74. विघ्नहर – अडथळे दूर करणारा
75. विघ्नहर्ता – विघ्न हरणारा
76. विघ्नविनाशन – अडथळे दूर करणारा
77. विघ्नराज – सर्व अडथळ्यांचा स्वामी
78. विघ्नराजेन्द्र – सभी बाधाओं के भगवान
79. विघ्नविनाशाय –अडथळ्यांचा नाश करणारा
80. विघ्नेश्वर – अडथळ्यांचा स्वामी
81. श्वेता – जो पांढरा शुद्ध आहे
82. सिद्धिप्रिय – इच्छा पूर्ण करणारा
83. स्कन्दपूर्वज – भगवान कार्तिकेयाचा भाऊ
84. सुमुख – शुभ चेहरा
85. स्वरूप – सौंदर्याचा प्रियकर
86. तरुण – ज्याला वय नाही
87. उद्दण्ड – खोडकर
88. उमापुत्र – पार्वतीचा पुत्र
89. वरगणपति – संधींचा स्वामी
90. वरप्रद – इच्छा आणि संधींचा दाता
91. प्रमोद – आनंद
92. पुरुष – अद्भुत व्यक्तिमत्व
93. रक्त – लाल रंगाचे शरीर असलेला
94. रुद्रप्रिय – भगवान शिवाचे आवडते
95. सर्वदेवात्मन – सर्व स्वर्गीय नैवेद्य स्वीकारणारा
96) सर्वसिद्धांत – कौशल्य आणि बुद्धिमत्ता देणारा
97. सर्वात्मन – विश्वाचा रक्षक
98. ओमकार – ओम आकाराचा
99. शशिवर्णम – ज्याचा रंग चंद्राला आवडतो
100. शुभगुणकानन – जो सर्व गुणांचा स्वामी आहे
101. योगाधिप – ध्यानाचा स्वामी
102. यशस्विन – सर्वात प्रिय आणि लोकप्रिय देव
103. यशस्कर – प्रसिद्धी आणि नशीबाचा स्वामी
104. यज्ञकाय – जो सर्व यज्ञ स्वीकारतो
105. विश्वराजा – जगाचा स्वामी
106. विकट – अत्यंत विशाल
107. विनायक – सर्वांचा स्वामी
108. विश्वमुख – विश्वाचा गुरु
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…