Author: झुंज न्यूज

प्रिंट, टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने, आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘झुंज न्यूज’ वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल करत आहोत. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय आपला प्रतिसाद आम्हाला नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे झुंज न्यूज परिवार आपले स्वागत करत आहे धन्यवाद. आपला अनिल वडघुले. संपर्क ‘झुंज न्यूज’ 9822083064 9673917313 9881444068 ईमेल Krantizunj@yahoo.in admin@zunjnews-in.preview-domain.com वेबसाईट : http://zunjnews-in.preview-domain.com

६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल भिगवण I झुंज न्यूज : वनखात्याच्या जमीनीवर मुरुम का टाकला ? असे म्हणुन गुन्हा दाखल करतो? अशी बतावणी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ६ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भिगवण येथील वनविभागाच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल भक्ती शक्ती प्युअर व्हेज जवळ केली आहे. उल्हास दत्तात्रय मोरे (वय ३२, भिगवण सर्कल कार्यालय, इंदापूर वनविभाग, ता. इंदापुर, जि. पुणे. (वर्ग-३) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीने…

Read More

– भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा – पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात आणखी एक मानाचा तुरा पिंपरी I झुंज न्यूज : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतीय लोकशाहीचा पाया संविधान अर्थात राज्यघटना आहे. या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती व्हावी. या करिता देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले जात आहे. त्याची पायाभरणी आज झाली. संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटावा, असे संविधान भवन उभारले जाईल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या पेठ क्रमांक 11 मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार…

Read More

टाटा मोटर्स एम्पलाइज यूनियनचे मा. जॉइंट सेक्रेटरी महेंद्र कदम यांचे प्रतिपादन  पिंपरी । झुंज न्यूज : सामाजिक व त्यागशील भावनेने काम करणे हीच स्व. रतन टाटा यांना श्रद्धांजली ठरेल . असे प्रतिपादन टाटा मोटर्स एम्पलाइज यूनियनचे मा . जॉइंट सेक्रेटरी महेंद्र कदम यांनी केले . अस्तित्व फाऊंडेशनने आयोजित केलेल्या श्रद्धाजंलीच्या कार्यक्रमात पुढे बोलतांना कदम यांनी स्व. रतन टाटा यांचे आणि कामगारांशी असलेल्या संबंधावर बोलतांना काही आठवणी सांगितल्या त्यात प्रामुख्याने रतन टाटा यांनी आपल्या कामात आधी महत्व कशाला ध्यायचे हे त्यांच्या कृतीतून शिकवण दिली . हा प्राधान्यक्रम प्रत्तेकाने जरी पाळला तरी त्या व्यक्तिच्या उत्कर्षाच्या वाटा कधीच थांबणार नाही . या कार्यक्रमात…

Read More

मुंबई । झुंज न्यूज : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं काय घडलं? बाबा सिद्दीकी यांच्यावर आज (12 ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर…

Read More

ज्येष्ठ पत्रकाराने अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत पाठविली मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पुणे I झुंज न्यूज : महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ‘श्रम-प्रतिष्ठेचे’ वातावरण तयार करून कायमस्वररूपी रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी योजना आहे असा आरोप करणारी नोटीस ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, राजकीय विश्लेषक आणि संस्कृतिक सिद्धांतकार विनय हर्डीकर यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव तसेच महिला व बाल विकास मंत्रालयाला पाठविली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने नागरिकांना राजकीय फायदा बघून पैसा वाटप करणे कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत बसत नाही. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेच्या नावापासून उद्देशापर्यंत सगळे राजकीय…

Read More

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर व हभप शिरीष महाराज मोरे यांना पुरस्कार पिंपरी I झुंज न्यूज : भारतामध्ये सद्यस्थितीला सहा कोटी पेक्षा जास्त घुसखोरांची संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत, परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले. रविवारी (दि.६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या…

Read More

शिरूर I झुंज न्यूज : गवळीबाबा तरुण मंडळ आयोजित नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आरतीचा मान पंचायत समितीच्या माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष आरती महेश भुजबळ यांनी स्वीकारला व आरतीला उपस्थित राहून महिलांना लाख मोलाचे मार्गदर्शनही केले. यावेळी आरती भुजबळ यांनी महिलांसह देवीची गाणी गायली तसेच गवळीबाबा तरुण मंडळाच्या वतीने संगीत खुर्चीच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्येही त्यांनी उस्त्फुर्त सहभाग घेतला. गवळीबाबा तरुण मंडळांनी पाठीमागे गणेशउत्सव काळात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरातील सहभागी महिलांना त्यांचे ब्लड रिपोर्ट वाटण्यात आले. तसेच डॉक्टर टेमगिरे सूर्य हॉस्पिटल शिक्रापूर यांच्या टीमने उपस्थित राहून उपचार व मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांची तब्येतीविषयी घ्यावयाची…

Read More

पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी I झुंज न्यूज : पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. आता मावळ विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून 44 कोटी 10 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून पूर, दरड प्रतिबंधक उपयोजना करण्यात येणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी निधी मिळण्याकरिता केंद्र, राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. राज्य शासन, पुणे, रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यातून…

Read More

पेरीविंकल शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी धरला ठेका अभ्यासाबरोबरच संस्कृती व संस्कार जोपासण्याचा प्रयत्न – राजेंद्र बांदल पुणे I झुंज न्यूज : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेमधील पेरीविंकल शाळेच्या प्रांगणात विदयार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या समवेत रंगला दांडीया व रासगरबा. दांडिया व गरबाची रास सुस मधील पेरीविंकलच्या प्रांगणात खास. शारदीय नवरात्रीच्या उत्साहामध्ये भव्य दिव्य दांडीया व रासगरबा सुस शाखेच्या पेरीविंकलच्या प्रांगणामध्ये संपन्न. चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सुस शाखेमध्ये शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचे औचित्य साधून त्या निमित्त भव्य दिव्य दांडीया व रासगरबा चे आयोजन…

Read More

पिंपरी I झुंज न्यूज : राज्यात अनैतिक आणि असंवैधानिक सरकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला सध्या ग्रहण लागले आहे. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णयामुळे गिधाडांच्या सत्तेला निमंत्रण दिले आहे. संविधानाची पायमल्ली होण्याचे असेच प्रकार भारतभर सुरू राहिल्यास देशात फोडाफोडीला ऊत येईल आणि हाहाकार माजेल अशी भीती ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी बुधवारी पिंपरी चिंचवड शहरात बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा असंवेदनशील आहेत अशी टिकाही ॲड. सरोदे यांनी केली. दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने बुधवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ज्येष्ठ पत्रकार नितीन ब्रम्हे यांनी ॲड. सरोदे यांची मुलाखत घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास…

Read More

विद्यार्थी किंवा खेळाडूंना ईजा झाल्यास जबाबदार कोण..? – सुहास कुदळे पिंपरी I झुंज न्यूज : स्मार्ट सिटी असलेल्या शहरातील पिंपरी येथे असलेल्या महात्मा फुले महाविद्यालय व नव महाराष्ट्र विद्यालय परिसरातील मैदानाची दुरावस्था झाल्याने विद्याथ्यांनी व खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर एखाद्या विद्यार्थी किंवा खेळाडू यांना ईजा झाली तर त्याला जबाबदार कोण.? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी परिसरातील हे सर्वात मोठे मैदान असल्याने तेथे आजू बाजूच्या गावातील अनेक खेळाडू या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. तसेच शाळेच्या कवायत व खेळ या ठिकाणी होत असतात. मात्र सध्या मैदान असूनही मोकळेपणाने खेळण्यासाठी त्रास होत आहे. गेल्या २…

Read More

वाकड I झुंज न्यूज : वाकड येथील सद्गुरु कॉलनी क्रमांक दोन मध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. भारतभर २ ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गांधीजींना आणि त्याच्या अहिंसात्मक विचारांचे स्मरण केले जाते. त्यांना आदरांजली वाहिली जाते. देशभर शाळा-कॉलेजमध्ये गांधीजींची जयंती साजरी केली जाते. गांधींचे जीवन एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने अन्याय आणि अत्याचारांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या कार्याची महत्ता आजही आपल्याला शिकवते की शांततेने आणि सत्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात…

Read More

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगणच्या वतीने आयोजन पिंपरी I झुंज न्यूज : 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान जागतिक पर्यटन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने छायाचित्र प्रदर्शन, तसेच तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. श्री तुषार कोडोलीकर यांचे ‘भारतीय वारसा स्थळे’ या विषयावरील मोबाईल छायाचित्रणाचे प्रदर्शन खास आकर्षण होते. सोबतच २७ सप्टेंबर रोजी ‘गिरिदुर्ग व स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व’ या विषयावरील सादरीकरण स्पर्धेस पिंपरी चिंचवड, पुणे, भोर, शिरूर आदी तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात १६ शाळांतून २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विविध गड – किल्ल्यांचा सखोल अभ्यास करून पॉवर…

Read More

बालरंग भूमी परिषदच्या वतीने आयोजन ; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग पुणे I झुंज न्यूज : बालरंग भूमी परिषद मध्यवर्ती आयोजित बालरंगभूमी परिषद पुणे शाखा संचलित “जल्लोष लोककलेचा “हा महोत्सव 24 सप्टेंबर2024 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड या ठिकाणी संपन्न झाला. हा महोत्सव महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित होता. एकल मध्ये नृत्य ,गायन, वादन तसेच सांघिक मध्ये समनृत्य व समूह गायन या प्रकारामध्ये पुणे जिल्ह्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. 6 ते 15 वयोगटातील 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. या महोत्सवाचे उद्घाटन नटराज पूजन व दिपप्रज्वलन करून बाल रंगभूमी परीक्षा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दिपाली शेळके व मान्यवर परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचा समारोप व पारितोषिक…

Read More

शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यातील दावडी येथे शिवसेना शाखा इमारतीचा अनावरण सोहळा शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड, महिला आघाडी सहसंपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे वर्पे, तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजीशेठ काळे, शिवसेना खेड तालुका समन्वयक अमोल दादा पवार, महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम पोतले, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब ताये, महिला आघाडी तालुकाप्रमुख उर्मिलाताई सांडभोर, ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख सुदाम कराळे, शिवसेना सल्लागार विश्वास नेहरे, युवासेना तालुकाप्रमुख मृण्मय काळे, उपतालुकाप्रमुख किरण गवारे, उपतालुकाप्रमुख विनोद वाडेकर, शहरप्रमुख दिलीप तापकीर, शेतकरी सेनेचे एल.बी.तनपुरे, ज्येष्ठ नेते बी.के.कदम, जेष्ठ नेत्या…

Read More

आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल संघटनेच्यावतीने कौतुक पारधी समाजातील मुलींनी पोर्णिमाचा आदर्श घ्यावा – माऊली भोसले पुणे I झुंज न्यूज : महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या पौर्णिमा अंजूस शिंदे यांचा सत्कार आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी पारधी समाजातील मुलींना पोर्णिमाचा आदर्श घेऊन विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करावे पोर्णिमाच्या जिद्दीला व कष्टाला सलाम असे मत संघटनेचे अध्यक्ष किसन माऊली भोसले यांनी व्यक्त केले. पोर्णिमा शिंदे यांची निवड मुंबई येथे झाली. व संघटनेच्या वतीने आदिवासी पारधी समाजातील क्रांतिकारी समशेर सिंह भोसले यांच्या 1858 मध्ये इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाबद्दल व कार्याबद्दल माहिती नमूद असलेले प्रतिमा देऊन पोर्णिमा शिंदे…

Read More

वाकड I झुंज न्यूज : श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगाम 2023-2024 या वर्षात सर्वाधिक ऊस पुरवठा केल्याबद्दल वाकड गावातील प्रगतशिल शेतकरी व माजी स्वीकृत नगरसदस्य मा. मोहनदादा आबाजी भुमकर यांना सलग सातव्या वर्षी सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वाकड येथील संत तुकाराम कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री नानासाहेब तथा विदुराजी नवले व संसदरत्न खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, संचालक बाळासाहेब विनोदे, ज्ञानेशजी नवले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, विविध मान्यवर,…

Read More

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याची जबाबदारी आमची – शंकर जगताप अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत 2,153 बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी संचाचे वाटप घरेलू कामगार, वाहन चालक, असंघटित कामगारांना अत्याधुनिक प्रशिक्षण विनामूल्य देणार – शंकर जगताप सांगवी I झुंज न्यूज : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारातून समाजातील शेवटच्या घटकातील, तळागाळातील सर्वसामान्य, कष्टकरी, गरजू नागरिकांपर्यंत केंद्र शासन असो, राज्य शासन असो अथवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या सर्वांच्या कल्याणकारी योजना पोहचविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. त्यामाध्यमातून लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचा जनसेवेचा वसा आणि वारसा अविरतपणे चालविण्याचा…

Read More

राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिल व काव्य लेखन स्पर्धा व पुरस्कार वितरण थाटात चिंचवड I झुंज न्यूज : नक्षत्राचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे ३९ च्या वतीने २५वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य मैफिल व काव्य लेखन स्पर्धा आणि पुरस्कार वितरण सायन्स पार्क नाट्यगृह चिंचवड येथे नुकता संपन्न झाला. वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी नारायण सुमंत उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष भाषणात ते म्हणाले की,” मौखिकता ही भाषेची मौलिकता असते. भाषेचा बोलीभाषेत वापर होत असतो. तोपर्यंत ती जिवंत असते. भाषेत रसात्मकता येणे गरजेचे असते. भाषेतील ग्रामलय आणि प्रासादिकता यामुळेच भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. हीच भाषेची अभिजातता…

Read More

माजी नगरसेवकांचा थेट अजितदादांनाच इशारा चिंचवड I झुंज न्यूज : लोकसभेला अजित पवार गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने घवघवीत य़श मिळवल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग सुर झाले आहे. तर, काहींची घरवापसीही होत आहे. पिंपरी-चिंचवड त्याला अपवाद नाही. शहरातील अजित पवार गटाचे बहूतांश माजी नगरसेवक तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. त्यातील चौघांनी बुधवारी (ता.२५) पत्रकारपरिषद घेऊन बंडाचे निशाणच फडकावले. चिंचवडमधील माजी नगरसेवक मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, विनोद नढे यांनी आज प्रेस घेऊन थेट अजितदादांनाच आव्हानाची भाषा केली. भाजपकडे असलेली चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे घेऊन तेथे नवीन चेहरा (म्हणजे त्यांच्यातील) उमेदवार दिला नाही, तर वेगळा विचार केला जाईल, असा थेट इशारा…

Read More