वाकड I झुंज न्यूज : श्री. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला गळीत हंगाम 2023-2024 या वर्षात सर्वाधिक ऊस पुरवठा केल्याबद्दल वाकड गावातील प्रगतशिल शेतकरी व माजी स्वीकृत नगरसदस्य मा. मोहनदादा आबाजी भुमकर यांना सलग सातव्या वर्षी सर्वाधिक ऊस पुरवठादार शेतकरी पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.
वाकड येथील संत तुकाराम कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेत माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री नानासाहेब तथा विदुराजी नवले व संसदरत्न खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, संचालक बाळासाहेब विनोदे, ज्ञानेशजी नवले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, विविध मान्यवर, सभासद व मोठ्या संख्येने कार्यक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.