पिंपरी : भाजयुमो पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने कोरोनाच्या संकट काळात खऱ्या अर्थाने कारोना विरुद्ध लढा देणाऱ्या कोरोना योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले.
कोविड योद्धांनी या महामारीच्या संकट काळात जे योगदान व सेवा केली आहे ती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, त्या अनुषंगाने रक्षाबंधन निमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील वायसीएम येथील कोविड योद्धा, सुरक्षारक्षक आणि पोलिस कर्मचारी यांना राखी बांधून त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच मनापा अयुक्त श्रवण हर्डीकर आणि साहायक आयुकत अजित पवार यांना पोस्टाने राखी पाठवण्यात आली.
तत्पूर्वी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांना ही राखी बांधण्यात आली.
याप्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजयुमो अध्यक्ष संकेत चोंधे, प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव, भाजयुमोचे सुमित घाटे, तेजस्विनी कदम, उदय गायकवाड, शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी, विक्रांत गंगावणे, सुप्रीम चोंधे, प्रियांका घाडगे, सारिका माळी, रोहिणी डुंबरे, धनश्री जुवेकर, सायली शहाणे, मुक्ता गोसावी, अंजली पांडे, पूजा आल्हाट, स्वाती गंगावणे, पूजा राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते.