चिंचवड | झुंज न्यूज : सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभाग क्र १७ येथील रहदारीच्या ठिकाणी व चौकामध्ये CCTV कॅमेरा बसवा अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तेजस खेडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या दूरसंचार विभागास निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी उपस्थित होते.
“चिंचवडेनगर येथे वारंवार घर फोडी, दरोडा यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची आणि व्यावसायिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जर परीसरात CCTV कॅमेरे लावले तर काही घटना घडल्यास गुन्हेगारांना शोधण्यास पोलिसांनाही मदत होऊ शकते. व गुन्हेगारीला आळा बसू शकतो. त्यामुळे परीसरात CCTV बसविणे गरज निर्माण झालेली आहे. असे तेजस खेडेकर यांनी ‘झुंज न्यूज’ शी बोलताना सांगितले.