थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव येथील रविदादा भिलारे सोशल फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना ५०० किलो अन्नधान्य वितरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोकण भाग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण ठिकाणी महापुराचे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली तसेच कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग या भागात पावसाने पूर्ण जनजीवन विस्कळीत केलं होतं.
येथील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता. त्यांच्या खाण्यापिण्याची तसेच त्यांच्या निवाऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. त्यामुळे गरज होती ती समाजाने त्यांना एक मदतीचा हात देण्याची. त्यामुळे युवा नेते व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर रवी भिलारे यांच्या पुढाकाराने रवीदादा भिलारे सोशल फाउंडेशनमार्फत पूरग्रस्तांना ५०० किलो अन्नधान्याचे वितरणासाठी कोकण खेड युवाशक्ती या सामाजिक संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
“संकटकाळी संकटात जो उभा राहतो तोच खरा देव असतो. याचीच जाणीव ठेवून पिंपरी चिंचवड थेरगाव मधील सामाजिक कार्यकर्ते रवी दादा भिलारे यांनी पूर्ण समाजात एक आदर्शाचा पायंडा घालून दिला आहे व ज्या नागरिकांना जशी जमेल तेवढी मदत करावी असे देखील आवाहन रवी भिलारे यांनी केले आहे.
_ 📽️एकदा 🤩 बघाच…!_
The Rising 🎬Stars Film Production निर्मित 🥳 माझं नवीन 🕺🏻धिंगाणा 😎अल्बम साँग 😱 “ओsss शेठ… 😈 या पाहटं पाहटं”… 🎼आपल्या मनोरंजनासाठी घेउन आलो आहोत. 💥 आजच्या वस्तुस्थितीला 🤓 लक्षात घेऊन या गाण्याची निर्मिती केली आहे…📽️ आता, रुबाबात 😈फिरणाऱ्या “शेठ” चा..🤓 जाळ अन् धुर तर 🔥निघणारच ना… ओ शेठ !!