श्रीमंत महाराजा फत्तेसिंह गायकवाड विद्यालयाचा निकाल ९० %
खेड : दावडी येथील श्रीमंत महाराजा फत्तेसिंह गायकवाड विद्यालयाचा यावर्षी निकाल ९० % लागला असून तनुजा साहेबराव दुंडे हि विद्यार्थिनी ९५.८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र विद्यालयाचे आणि तनुजाचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तनुजाचे आई वडील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून दुग्ध व्यावसायिक आहेत. काका बाळासाहेब दुंडे यांचा शिक्षकी पेशा असल्याने त्यांचे वेळोवेळी मौलाचे मार्गदर्शन तनुजाला लाभले. असे तनुजाने सांगितले.
“गावात जास्त सोइ सुविधा नसतानाही आई बरोबर प्रसंगी शेतातील कामे करून मिळेल त्या वेळेत पण प्रामाणिकपणे मन लावून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केल्यामुळे हे यश तनुजा संपादन करू शकली. त्यामुळे गावात तिचे अभिनंदन केले जात आहे.”