हिंजवडी : आयटीनगरी माणच्या उपसरपंचपदी प्रिती संतोष पारखी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संदीप ओझरकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
यासाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात नुकतेच एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र भोसले होते तर ग्रामविकास अधिकारी भरत पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
“निवडीनंतर मुळशी तालुका पंचायत समितीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रिती पारखी यांनी सांगितले.”