हिंजवडी : आयटीपार्क पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे दत्तवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पै. शरद किसन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दत्तात्रय जाधव यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली.
बुधवारी (दि.२९) सकाळी नेरे गावठाण ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रिये दरम्यान अध्यक्षस्थानी सरपंच विद्या जाधव होत्या तर, ग्रामविकास अधिकारी देवेंद्र नलावडे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
निवडीनंतर, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, शिवसेना नेते राहूल जाधव, तुकाराम जाधव, लक्ष्मण जाधव, अशोक गायकवाड तसेच रामदास मेमाणे यांनी नेरे दत्तवाडी समस्त ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंचाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“जिद्द, चिकाटी आणि मित्रमंडळींची वेळोवेळी लाभलेली खंबीर साथ यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याची भावना उपसरपंच शरद शिंदे यांनी व्यक्त केली.”