शिरूर I झुंज न्यूज : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उरळगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
ग्रामपंचायत उरळगाव, आर.एम.डी धारिवाल फांऊडेशन आणि महागणपती फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “वृक्षारोपण” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जास्तीत जास्त झोडे लावुन संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच उपस्थित ग्रामस्थांकडुन झाडासाठी लागणारे कंपाउंड जाळी प्रत्येक व्यक्तीने देण्याचे आश्वासन देले.
या कार्यक्रमाप्रसंगी उरळगावचे आदर्श सरपंच सुनिल सात्रस, कृषिधिकारी कैलास चव्हाण, कृषिधिकारी सात्रस, जेल अधिकारी रावसाहेब गिरमकर, पशुवैद्यकीय अधिकारी बाबजी गिरमकर, सरपंच गजानन जांभळकर, उपसरपंच शशिकांत कोकडे, माजी उपसरपंच अशोकअप्पा चव्हाण, सदस्य स्वप्नील गिरमकर, सदस्य दीपक काळे, सदस्य मोहन सात्रस, सदस्य सचिन पाचुंदकर, मा. व्हा चेअरमन सागर कोळपे, संजयअप्पा जांभळकर, बाजीरावनाना आफळे, संतोष मुथा, भरत आफळे, सोमातात्या सात्रस, दत्ता आफळे, निलेशशेठ सावंत,संदीप बांडे, विनोद होलगुंडे, किरण माने, मच्छिद्र गुंजाळ, सागर वायदंडे उपस्थित होते.