पिंपरी | झुंज न्यूज : महानगरपालिका आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे हे निश्चित करण्यात आलेले नाही. सध्याच्या परिस्थितीत निश्चिती करावयाची झाल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात ज्या छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे , अशा घटकांना प्रत्येकी रक्कम रुपये १५००/- चा लाभ देणे बाबत जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर चालू आहे. असे असताना त्याच कारणासाठी रक्कम रुपये ३००० रू. चे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्यामुळे एकाच लाभार्थ्यांना एकाच कारणासाठी दोनदा आर्थिक लाभ मिळणार आहे.
वस्तुस्थितीचे अवलोकन करता शासन निर्णय नगर विकास विभाग दिनांक २९/०४/ २०२१ व शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक ३०/०४/२०२१ नुसार शहरातील अनधिकृत फेरीवाले पथक विक्रेते व घरेलू कामगार यांना रक्कम रुपये १५०० रू. ची आर्थिक मदत देण्यात येत आहे.
याप्रमाणे शासनाकडून आवश्यक त्या आर्थिक दुर्बल घटकां करिता विविध स्वरूपात मदत देण्यात येत आहेत. तसेच महानगरपालिका अधिनियम अंतर्गत थेट स्वरूपात आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आतील कलम ६३ व ६६ मधील तरतुदीनुसार शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करणे या कामास दिसून येत नाही.
“कलम ६३ (१) ब मधील सामाजिक विकासाचे आर्थिक योजना आखणे या तरतुदीनुसार कोणत्याही स्वरूपाची योजना दीर्घकालीन मुदतीसाठी राबवल्या जातात. तथापि सदर योजना ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात राबवायच्या आहेत. या कारणास्तव नागरिकांना रक्कम रुपये ३००० रू. देणेबाबत मनपा अंमलबजावणी करू शकत नाही. असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे.