शिरूर | झुंज न्यूज : सध्या covid-१९ च्या जागतीक महामारीतुन आपली माणसं , आपलं घर , त्या सोबतच आपलं गाव सुरक्षित राहीलं पाहिजे या उद्देशातून स्वराज्य प्रतिष्ठाणच्या वतीने सोनेसांगवी गावात प्रत्येक घरात मोफत वाफेचे मशिन देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
या उपक्रमासाठी किशोर दाते, महेंद्र शेळके (युवासेना शिरूर आंबेगाव तालुका सरचिटणीस) आणि दिगंबर शेळके तसेच मोरया सामाजिक प्रतिष्ठान संचालित कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता कार्यकारिणी सदस्य यांचे विशेष सहाय्य लाभले.
महाराष्ट्र राज्य आणि स्वराज्य प्रतिष्ठाणचे प्रविण शेळके, अनिकेत दाते, प्रथमेश आवटे, अविभैय्या शेळके, अक्षय शेळके, संकेत दाते, प्रतिक आवटे, अजित शेळके, सुयोग दाते, किरण पाडळे, स्वप्निल शेळके, यांच्या विशेष प्रयत्नाने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.