वाकड | झुंज न्यूज : स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणा-या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी सॉलिटेअर बिझनेस हब मध्ये सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.०१) हि कारवाई केली.
याप्रकरणी स्पा सेंटर मालक जया राकेश यादव (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) व स्पा मॅनेजर खुशी सैनप्पा शिंदे (वय २३, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी या कस्पटे वस्ती, वाकड येथील सॉलिटेअर बिझनेस हब मध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यवसाय चालवत होत्या. सामजिक सुरक्षा विभागाने गुरुवारी (दि.०१) याठिकाणी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. तसेच साडे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.