माढा : झुंज न्यूज : संभाजी ब्रिगेड माढा तालुका कार्यकारिणी बैठक शिवश्री सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, शिवश्री सुहास टोणपे – जिल्हा सचिव, शिवश्री दिनेश जगदाळे-नेते , शिवश्री प्रदीप पाटील-जिल्हा संघटक, यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यावेळी चित्रपट आघाडी जिल्हा संघटक पदी अभिनेते संभाजी बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच अनेक पदाधिकाऱ्यांच्याहि नवनियुक्ती करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे
शिवश्री बाळासाहेब वागज (सर) : तालुका संघटक, माढा
शिवश्री शंकर नागणे : तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी
शिवश्री श्रीकांत गायकवाड : विभागप्रमुख, कुर्डू जि.प.विभाग
शिवश्री अजिंक्य चव्हाण : विभागप्रमुख, मानेगाव जि.प.विभाग
शिवश्री वैभव शिंदे : गटप्रमुख, पं.स.मोडनींब
शिवश्री भारत जगताप : गटप्रमुख, पं.स.टेंभुर्णी
शिवश्री अजय गायकवाड : शहराध्यक्ष, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, टेंभुर्णी
यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बालाजी जगताप, कार्याध्यक्ष शिवश्री सतीश चांदगुडे, उपाध्यक्ष शिवश्री प्रकाश नागटिळक, जेष्ठ नेते शिवश्री चंद्रकांत आबा गिड्डे, करमाळा संपर्कप्रमुख शिवश्री गणेश शिंदे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष अरुण जगताप, परितेवाडी शाखाप्रमुख शिवश्री अंकुश जाधव, शिवश्री सिध्देश्वर सावंत, शिवश्री सचिन सावंत, परिते शाखाप्रमुख शिवश्री नानासाहेब कौलगे, चव्हाणवाडी ग्रां.प.सदस्य शिवश्री नवनाथ शिंदे, धनंजय भोसले, युवा नेते शशिकांत गिड्डे, सागर चव्हाण, अविनाश नांगरे उपस्थित होते.