पिंपरी I झुंज न्यूज : आचार्य अत्रे रंगमंदिर येथे घेण्यात आलेल्या “महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२१” या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकावला असून परळी (जिल्हा बीड ) येथील अदिती वाघमारे दुसरा क्रमांक तर वाई (जिल्हा सातारा) हिला तिसरा क्रमांक देण्यात आला आहे. माझा आवाज व लॉलीपॉप एंटरटेनमेंट यांच्या वतीने महाराष्ट्रातील महिला व तरुणींसाठी “महाराष्ट्राची सौंदर्यवती २०२१ हा महिलांचे सौंदर्य व टॅलेंट यावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ३५ महिला व तरुणींनी सहभाग घेतला.
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दि २७ फेब्रुवारी दिवसभर व २८ फेब्रुवारी सांयकाळी ४ वाजेपर्यंत ग्रोमिंग(प्रशिक्षण) देण्यात आले, व सांयकाळी ४.३० वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या दोन राऊडमध्ये ३५ स्पर्धकातून टॉप ११ काढण्यात आले. सांयकाळी ०६.३० वाजता टॉप ११ मधून टॅलेंट राउंड घेण्यात आला व त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे व प्रसिद्ध फॅशन मॉडेल संध्या पांडे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संपादक नाना कांबळे, गायत्री पैठणीचे संचालक अमोल रोडे, ऑक्सिहाय बेवरेजचे संचालक विशाल लोहीटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी सविता कुंभार (मिसेस युनिव्हर्स हॉनेस्टी), पूजा रेड्डी (फॅशन मॉडेल), मधूशा झाळके (मिसेस इंडिया अर्थ फेमस) व पीयूषा काटकर (रन वे मॉडेल) यांनी परिक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी केले. प्रास्ताविक बापूसाहेब गोरे व आभार संजय जोगदंड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी दिग्दर्शक सतीश सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यास एक लाख रुपये येवला पैठणी, सोन्याची नथ क्राऊन व सासे, दुसऱ्या क्रमांकास एकावन्न हजार रुपये, येवला पैठणी, सोन्याची नथ क्राऊन व सासे व तिसऱ्या क्रमांकास एकेविस हजार रुपये येवला पैठणी, सोन्याची नथ क्राऊन व सासे देण्यात आले.