पुणे I झुंज न्यूज : सन २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये हे दोन चेहरे देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले होते ते त्यांच्या तेथील घटनेनंतर काहींच्या मते हे बजरंग दलाचे कार्यकर्ते तर काहींनी संघाचे असल्याचे म्हटले ते कोणत्या संघटनेचे या पेक्षा ते आज काय करतात हे महत्वाचे त्यांना त्यांच्या त्यावेळच्या क्रियेबद्दल अनेक नेत्यांनी त्यांना आधार त्यावेळी दिला असेल पण आज हे दोघे स्वतःच्याच कमाईवर कष्टावर घर चालवतात आणि विशेष म्हणजे एकमेकांच्या कार्यक्रमाला ते न विसरता एकमेकाला बोलावतात.
सध्या समाजमाध्यमांवर या दोघांचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमुळे जुन्या आठवणीला उजाळा देत ते हेच का ? असा प्रश्न केला जात आहे. कपाळावर भगवी पट्टी बांधलेला अशोक परमार व हाथ जोडून रडत रडत जीवनदान मागणारा कुतबुध्दीन अंसारी अहमदाबाद हे त्या काळातील जवलंत फोटो जगभर पसरले होते.
दोन्ही २००२ च्या गुजरात दंगली मधील प्रसिध्द चेहरे होते. एवढ्या वर्षांनंतर ते आपल्या आयुष्याकडे वळून बघतात तेव्हा ते एकमेकाच्या गळ्यात गळे घालून रडतात. कुतबुध्दीनने जेव्हा आपल्या पुस्तकाचे प्रकाशन केले तेव्हा अशोक परमारला बोलावले व अशोकने जेव्हा चप्पलचे दुकान टाकले तेव्हा उदघाटनाला कुतबुध्दीनला बोलावले होते. आज ते आपल्या आयुष्यातील वाईट घटनांना विसरून नविन आयुष्य जगत आहेत.
नेते सरकार बनवतात, त्यांची मुले परदेशात शिकून येतात तेव्हा त्यांच्यासाठी येथे सरकारी खुर्ची तयार असते. पार्टी कोणतीही असो, द्वेषाच्या आगीत भाजून निघणारे सामान्य लोकच असतात. अर्थात आजच्या अशोक परमार व कुतबुध्दीन अंसारी आणि आजच्या तरूणांनी लक्षात ठेवली पाहीजे. जर हे दोघे कोण्या राजकीय पक्षाचे असते तर ते सभागृहात दिसले असते तर त्याचे आश्चर्य वाटायला नको गुजरात घटनेला अनेकजण विसरले असतील पण हे दोन चेहरे एकमेकाला विसरले नाहीत हे आजच्या व्हायरल पोष्टमधून दिसून येते.