(प्रतिनिधि : मनोज सोनवणे )
सांगवी | झुंज न्यूज : हिंजवडी ते भोसरी एम.एच.१४ एच यु ६५३३ क्रमांकाच्या बसमध्ये भोसरी एमआयडीसी बस थांबा येथे प्रवाशी उतरल्या नंतर बसमध्ये एक बॅग बसचे वाहक श्रीमंत घोगरे व चालक संदीप अबनावे यांना मिळून आली. सदर बॅग तपासली असता त्यात कोणत्याही प्रकारचा सम्पर्क क्रमांक व इतर ओळख मिळून आली नाही व त्यात रोख पाच हजार रुपये, चाळीस हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व कागदपत्रे असल्याने सदर बॅग प्रामाणिकपणे बस स्थानक प्रमुख वाहतूक नियंत्रक काळुराम लांडगे व विक्रम जाधव यांच्याकडे वाहक व चालक यांनी दिली. त्यामूळे बस चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रवासी एस सुरेश, दत्त मंदिर रोड, वाकड यांची ही बॅग हरवली होती. त्यांना आपली बॅग हरवली असल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वारगेट स्थानकात सदर माहिती दिली त्यावेळी पिंपरी मुख्यालय संतोष माने व वाहतूक इस्पेक्टर मिलींद शेवाळे यांना फोन आला त्यांनी ही माहिती भोसरी स्थानकात दिली. प्रवासी आल्यानंतर त्यांना विचारपुस व ओळख पटवून सदर बॅग सहननिशा करून ताब्यात देण्यात आली.
कोरोना संकट काळानंतर जनजीवन सुरळीत झाले असताना प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपीएल सुरु झाली आहे. मात्र दररोजची धावपळ व घाईघाईने अनेक वेळा व जाणूनबुजून चोरीच्या उद्देशाने अनेक वेळा बॅग, पाकीट, पर्स गहाळ होण्याच्या घटना घडत असतात. बॅग, पर्समध्ये असलेले महत्त्वाचे कागदपत्रे व रोख रक्कम मिळून येत नाही. परंतु काही प्रामाणिक व चांगल्या लोकांमुळे हरवलेले साहित्य, पैसे व इतर गोष्टी सहीसलामत मिळून येण्याच्या सुखद धक्का देणाऱ्या घटना घडत असतात.
वाकड येथील या घटनेमध्ये रोख रक्कम असलेली बॅग परत दिल्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक स्वभावाबद्दल प्रवाशी व नागरिकांनी वाहक, चालक व तेथील बस प्रमुखांचे आभार व्यक्त केले आहेत.