हिंगणघाट | झुंज न्यूज : स्थानिक जेष्ठ नागरिक संस्था तसेच फ़ेस्काम संलग्न स्पंदन महिला मंडळाचेवतीने स्थानिक शिवाजी वार्ड येथील जेष्ठ नागरिक संस्था सभागृहात जेष्ठ नागरिक महिलांचे आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिर आज दि.१२ रोजी आयोजित करण्यात आले.
सदर आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे अध्यक्षस्थानी स्थानिक जेष्ठ नागरिक संस्थेचे सचिव रमेश वानकर हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून स्पंदन जेष्ठ नागरिक महिला संस्थेच्या अध्यक्षा प्रा. लीलाताई नरड, उपाध्यक्षा दुर्गाताई धांदे, उपाध्यक्षा कल्पना चिटटवार, माजी पंचायत समिति सभापती लताताई घवघवे, निलीमा वानकर इत्यादि मान्यवार उपस्थित होते.
सर्वप्रथम देवी सरस्वतीचे प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय चमुतील समुपदेशक अजय लिडबे तसेच इतरांनी जेष्ठ नागरिकांनी आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले.
वैद्यकीय चमुमधे आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत बारडे, परिचारिका रेखा मानकर (शंभरकर), निशा पाचखंडे, मेघा चल्लीरवार इत्यादिचा समावेश होता. शिबिरात एकूण २२ महिला पुरुष जेष्ठ नागरिकांची रक्तदाब, मधुमेह तसेच रक्तगट तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सुत्रसंचालन उपाध्यक्षा कल्पना चिट्टटवार यांनी व आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव दुर्गा धांदे यांनी केले. शिबिराचे यशस्वितेसाठी स्मिता ढगे, शशिकला बांगडे, विजया गिरी, सुशिला कनोजिया, शोभा नागुलवार, सुनंदा धोत्रे यांनी सहकार्य केले.