चिंचवड I झुंज न्यूज : पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने “वाहतूक सुरक्षा अभियान २०२१” निमित्त पोलीस आणि नागरिकांसाठी “मोफत आरोग्य शिबीर” आयोजित करण्यात आले होते. “आदित्य बिर्ला हॅास्पिटल” च्या डॅाक्टरांचे सहकार्य लाभले.
यावेळी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरिक्षक संजयजी जाधव, संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे,डॅा विनय सैनी, अभिजित पांडे, भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन लाड, संतोष साठे, हवेली तालुका अध्यक्ष सागर पाचर्णे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाग्योदय घुले,उपाध्यक्ष राजु पाटील, युवक उपाध्यक्ष कमलजित मेहता, कार्याध्यक्ष पराग जोशी, कार्तिक गोवर्धन, रूषि वारे, प्रशांत भालेराव, रणजित वडणे, अभिजित चांदलेकर, आकाश कांबळे, अर्थव डांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.