पिंपरी | झुंज न्यूज : तब्बल ७० दिवस शेतकरी थंडीत , उन्हा तान्हात आंदोलन करत आहेत पण हीरो अक्षयकुमार यांना त्यांची आठवण झाली नाही. पण काल अचानक, भारताची एकता धोक्यात आहे असे अक्षय कुमारला वाटले. आमच्यासाठी शेतकरीच आमची एकता आणि शेतकरीच आमचा भारत. असो… ! त्यामूळे ७० दिवसांनी जागे झाल्याबद्दल कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना सर्वोच्च पुरस्कार द्यावा असा खोचक सल्ल्याचे पत्र लिहले आहे.
शेतकरी आंदोलनाला ७० दिवस झाले आहेत. रिहाना या गायिकेने या आंदोलनाची विचारपूस केली, काळजी व्यक्त केली आणि समाज माध्यमांवर भाजप सरकार विरुद्द्धचा रोष अजूनच वाढला. रिहानाच्या ट्विटला उत्तर म्हणून अनेक क्रिकेटरांनी आणि सेलिब्रिटींनी एकाच दिवशी आणि एकच मजकूर असलेले ट्विट केले. यात अक्षयकुमार सुद्धा होता.
गेले ७० दिवस शेतकरी थंडीत , ऊन वाऱ्यात आंदोलन करत आहेत. तेव्हा कॅनडाचा नागरिक असलेल्या अक्षयकुमारला शेतकऱ्यांची काळजी वाटली नाही हे या पत्राद्वारे माधव पाटील यांनी कॅनडाच्या पंतप्रधांना लक्षात आणून दिले.
IndiaAgainstPropoganda #IndiaTogether
असा हॅशटॅग चालवून भारताची एकता टिकवून ठेवा असे आवाहन अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटींनी केले होते. माधव पाटील या पत्रात अक्षयकुमार यांना खोचक टोला लगावताना म्हणतात की, भारत म्हणजेच शेतकरी आणि शेतकरी म्हणजेच भारत. एकतेच्या नावाखाली त्या शेतकऱ्यांना अक्षयकुमार साफ विसरला. तरी कॅनडा सरकारने अक्षय कुमार यांना कॅनडा सरकारचा सर्वोच्च पुरस्कार द्यावा असा खोचक सल्लाही पंतप्रधानांना या पत्राद्वारे दिला.
शेतकरी लोकशाही मार्गाने लढा लढत आहेत आणि लोकशाही मार्गाने तो प्रश्न मार्गी लागेल असेही या पत्रात माधव यांनी म्हंटले आहे. समाज माध्यमांवर माधव पाटील यांचे हे पत्र व्हायरल झाले होते.