अॅड. सुप्रिया सस्ते यांच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन
पिंपरी I झुंज न्यूज : नवोदित वकिलांनी व्यवसायात यश मिळविण्यासाठी सचोटीने, प्रामाणिकपणाने व्यवसाय करावा. व्यवसायाप्रती असणारी नीतिमत्ता वकिलांना नावलौकिक मिळवून देते, असे मत भोसरीतील कायदातज्ञ व नोटरी अॅड. बाळासाहेब थोपटे यांनी व्यक्त केले.
अॅड. थोपटे यांच्या हस्ते चऱ्होली येथे अॅड. सुप्रिया सस्ते यांच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सागर बोरुंदीया, माजी अध्यक्ष विकास कुऱ्हाडे, उद्योजक सुरेश बलदोटा, नगरसेवक किसन तापकीर, संदीप रासकर, दादासाहेब जैद, प्रशांत कुऱ्हाडे, हभप. पुरुषोत्तम पाटील, नरहरी चौधरी, संग्राम बापू पाटील, माजी सरपंच मारुती सस्ते, अश्विनी सस्ते, अॅड. किशोरी देशमुख, अॅड. संदेश थोपटे आदी उपस्थित होते.
अॅड. थोपटे पुढे म्हणाले की, वकिली व्यवसायामध्ये शॉर्टकट नसतो. त्यासाठी सातत्यानं अद्ययावत अभ्यास करावा लागतो. कायद्याचे ज्ञान अर्जित करून पक्षकारांना सकारात्मक मार्गदर्शन करावे लागते. अनेक नवीन विषयांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवावे लागते. नवोदित वकिलांनी व्यसनांपासूनही दूर रहावे.
उपस्थितांचे स्वागत उद्योजक बापूसाहेब सस्ते, महादेव सस्ते यांनी तर, आभार अॅड. सुप्रिया सस्ते यांनी मानले.