(प्रतिनिधी : शरद जठार)
शिरूर I झुंज न्यूज : शिरूर तालुक्यात १५ जानेवारी रोजी ७१ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले व १८ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला होता. सरपंच पदाची आरक्षण काढण्यात आली होती. पण, सरपंच पदाच्या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती. पुणे जिल्हाधिकारी यांनी सोमवारी आदेश काढून पुणे जिल्ह्यातील व शिरूर तालुक्यातील सरपंचपदाच्या निवडणुका जाहीर केल्या.
शिरूरच्या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अव्वल कारकून मंडळ अधिकारी व अधिकारी यांची सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे.
शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाची निवडणूक पुढील प्रमाणे
०९ फेब्रुवारी रोजी :
निमगाव दुडे, रावडेवाडी, बाभुळसर बुद्रुक, विठ्ठल वाडी, दहिवडी, नागरगाव, न्हावरे, आंधळगाव, तळेगाव ढमढेरे, पिंपळसुटी, सविंदणे, कोळगाव डोळस, जातेगाव बुद्रुक, आमदाबाद, निर्वी, कुरूळी, गुनाट, मलठण, आलेगाव पागा, चिंचोली मोराची, कवठे यमाई, वडगाव रासाई, गणेगाव दुमाला, वरुडे, इनामगाव, निमगाव भोगी, चांडोह, चिंचणी, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, सादलगाव, फाकटे, पिंपरखेड, उरळगाव, निमगाव म्हाळुंगी, शिंडोडी.
१० फेब्रुवारी रोजी :
खैरेनगर, धामारी, वढू बुद्रुक, कोंढापुरी, सणसवाडी, मोठेवाडी, वाघाळे, पाबळ, भांबर्डे, केंदुर, निमोने, हिवरे, शिक्रापूर, मुखई,,करंदी, कारेगाव, खंडाळे, पारोडी, आपटी, पिंपळे जगताप, कानुर मेसाई, टाकळी भिमा, पिंपरी दुमाला, मिडगुलवाडी, बाभुळ सर खुर्द, गोलेगाव, गणेगाव खालसा, कोरेगाव भीमा, वाडा पुनर्वसन, पिंपळे खालसा, जातेगाव खुर्द, खैरेवाडी, बुरुंजवाडी, दरेकरवाडी, डिंग्रजवाडी.