(प्रतिनिधी : औदुंबर पाडुळे )
परांडा I झुंज न्यूज : महाराष्ट्र राज्य मध्ये ग्रामपंचायत निवडणूककांचे बिगुल मोठ्या प्रमाणात वाजू लागल्याने सर्व उमेदवार, पॅनल प्रमुख मतांची बेरीज वजाबाकी करण्यात व्यस्त आहेत. काही उमेदवार खेड्याकडून शहराकडे उपजीविकेसाठी गेलेल्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात व्यस्त आहेत. अशातच परांडा तालुक्यातील ढगपिंपरीगावही ग्रामपंचायत निवडणूकी साठी सज्ज झाले आहे. सध्या ढगपिंपरी गावातील ग्रामपंचायत निवडणूकीचे राजकारण जोरदार तापू लागले आहे. पाच वर्षात केलेल्या गावच्या विकासकामाच्या जोरावर सरपंच बप्पाजी काळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
शंभू महादेव ग्रामविकास आघाडी पॅनल मध्ये वार्ड क्रमांक १ मधून ओबीसी पुरुष गटातून पाच वर्षे सरपंच म्हणून कामकाज पाहिलेले बप्पाजी काळे चिन्ह कपबशी, ग्रामपंचायत यशस्वी सदस्य म्हणून काम पाहिलेले सारंग खंडागळे (सर्वसाधारण पुरुष गट), सर्वसाधारण महिला गटातून कुमा लक्ष्मण वाघमोडे चिन्ह सिलेंडर . तसेच वार्ड क्रमांक २ मधून ओबीसी गटातून सरपंच बप्पाजी काळे यांच्या पत्नी प्रज्ञा बप्पाजी काळे चिन्ह कपबशी , सर्वसाधारण पुरुष गटातून रामा देवराम गरड चिन्ह सिलेंडर तर वार्ड क्रमांक ३ मधून तुल्यबळ असणाऱ्या सर्वसाधारण महिला गटातून सविता किसन हिवरे चिन्ह कपबशी आदी दिग्गज उमेदवार निवडणूकी साठी सामोरे जात आहेत.
यावेळी सरपंच बप्पाजी काळे बोलताना म्हणाले की, पाच वर्षे गावचा सरपंच म्हणून काम पाहताना गावच्या विकासाकडे लक्ष दिले. गावात सुसज्ज रस्ते, वीज, गटारे, पिण्याचे पाणी, दुष्काळ काळात जनावरांना चारा छावण्या, हागणदारी मुक्त गाव, शेततळी, घरकुल, कोरोना काळात औषध फवारणी, मास्क वाटप आदी विषयावर प्रामाणिक पणे काम केले. यापुढे ही ढगपिंपरी गावची तालुक्यात एक आदर्श गाव म्हणून ओळख करण्यासाठी काम करणार असल्याचे बप्पाजी काळे यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा, राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्या समोर ढगपिंपरी गाव अधिक कसे आदर्श होईल या कडे लक्ष देणार आहे.
आदर्श ग्रामपंचायत होण्यासाठी पुढील कामे करणार
१.गावच्या उपस्थिततीत गावातील सर्व समस्या सक्षमपणे सोडविणार
२. भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत हे ब्रीदवाक्य अमलात आणणार
३. युवकांना व्यवसाय मार्गदर्शन व शैक्षणिक मार्गदर्शन यासाठी नियोजन करणार
३. वयोवृद्ध व लहान मुलांसाठी बगीचा व खेळाचे मैदान निर्मिती साठी प्रयत्न करणार
४. महिलांना ग्रामपंचायती मार्फत लघुउद्योग उभारणी व आर्थिक मदत यांची उपाय योजना करणार
५. महिला संरक्षण व गावातील गैरप्रकारावर वेळीच कायद्याचा आधार घेऊन प्रतिबंध करणार
६. स्वच्छ भारत समृद्ध भारत हे ब्रीद वाक्य अमलात आणून गावामध्ये शोचालय, गटार बांधकाम यांचे नियोजन करून ते पूर्ण करणार
७. गावातील रस्ते , पिण्याचे स्वच्छ पाणी ,लाईट सुविधा यांची पूर्तता करणार
८. गावातील शाळा , प्राथमिक आरोग्य केंद्र ,कृषी विभाग यांच्यातील कमतरता वर अभ्यास करून योग्य त्या सुविधा आणण्यासाठी प्रयत्न करणार
९. दारू व इतर व्यसन मुक्त राजकारण करणार
१०. गावामध्ये सशक्त आणि सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करणार
यामुळे ढगपिंपरी गावच्या विकासासाठी व एक आदर्श गाव म्हणून ओळख करण्यासाठी शंभु महादेव ग्रामविकास आघाडीतील सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे अवाहन सरपंच बप्पाजी काळे यांनी केले.