(प्रतिनिधी : सचिन कदम)
मांजरी बुद्रुक I झुंज न्यूज : यंदा शेतकऱ्यांनी आपआपल्या परीने गव्हाच्या पिकाची विक्रमी दोन ते तीन हेक्टरी पेरणी केली आहे, परंतु याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे सध्या गव्हाच्या पिकाला अनकूल पोषक वातावरण असल्याने मांजरी परिसरात गव्हाचे पीक हे जोमदार बहरलेले दिसत आहे.
सर्वच शेतकऱ्याचे गहू पीक अतिशय दाट स्वरूपात पेरणी केली असली तरी गव्हाणे आपली जागा सोडली नाही. सद्याचे हवामान स्वरूप सकाळचे २३ अंश सेल्सिअस आणि रात्रीच २० सेल्सिअस आणि दव १९ अंश सेल्सिअस स्वरूपात तापमान असल्याने गहू आणि हरभरा पिकाला या पोषक अनुकूल वातावरणाचा नक्कीच फायदा होऊन भरघोस उत्पादन मिळेल आणि शेतकरी खुश राहणार आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे नागरिकांकडून बाहेर फिरणे कमी झाल्याने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून वातावरणात आमूलाग्र बदल होत आहेत. यंदा पोषक वातावरण असल्याने आणि पाऊसही चांगला झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूनचे हवामान शेतीसाठी योग्य ठरत आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसू लागले आहे.