थेरगाव I झुंज न्यूज : थेरगाव मधील प्रभाग क्र २३ भाजपा महिला अध्यक्षपदी प्रियांका अमित जगताप यांची निवड करण्यात आली. जगताप यांच्या आज पर्यंतच्या सामाजिक कार्याची दाखल घेत हि निवड करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड भाजपा महिला अध्यक्ष उज्वलताई गावडे, किवळे- सांगवी महिला मंडल अध्यक्ष पल्लवी वाल्हेकर, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे, नगरसेविका अर्चना बारणे, मानिषा पवार, नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेवक कैलास बारणे, युवा नेते तानाजी बारणे उपस्थित होते.
”पक्षाने माझ्यावर महिलापदाची मोठी जबाबदारी दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन काम करणार. आगामी सर्व निवडणुकामध्ये भाजप पक्ष आघाडीवर कसा राहील, यासाठी मी कार्यरत राहीन.” तसेच पक्षाची ध्येय धोरणे व राज्यात तसेच केंद्रात केलेल्या कामांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार.
(- प्रियांका जगताप, प्रभाग क्र २३ भाजपा महिला अध्यक्ष )