खेड I झुंज न्यूज : आळंदी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सुभाषराव बोराटे यांची मनसेच्या खेड तालुका (रस्ते साधन सुविधा आस्थपणा) अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. बोराटे यांच्या आज पर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत हि जबाबदारी सोपविण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व रस्ते साधन सुविधा आस्थपणाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश परुळेकर व सरचिटणीस योगेश चिले यांच्या मार्गदर्शनानेहि नियुक्ती करण्यात आली. हेमंत संभुस (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व प्रवक्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना) व पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भांडवलकर आणि जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आळंदी शहरअध्यक्ष तुषार नेटके, शिरूर तालुका रस्ते साधन सुविधा आस्थपणा अध्यक्ष सुदाम चव्हाण, शिरूर तालुका कामगार सेना अध्यक्ष रवी गुलाडे, खेड तालुका उपाध्यक्ष युवराज चौधरी, मा. शहराध्यक्ष निलेश घुंडरे, उपाध्यक्ष किरण नरके आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.