लातूर | झूंज न्यूज : लातूर जिल्हा परिषदेने अति महत्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आपल्या जन्म दात्या आई वडिलांना सांभाळणार नाहीत, त्यांच्या एकून पगारातून तीस टक्के पगार कापून आई वडिलांच्या बॅंक खात्यात जमा करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून महासभेत एक मुखाने मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी या निर्णयाची अमलबजावणी केली असल्याचे या वेळी सांगितले. लातूर जिल्ह्य परिषदेचे एकून १४ हजार कर्मचारी आहेत. या सर्वांसह शिक्षकांनाही हा नियम लागू असून या निर्णयाची कडक अंमल बजावनी करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सि ई ओ यांनी सांगितले. तर हा कायदा संपूर्ण राज्यात सर्व जिल्हा परिषदांनी लागू करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.
आज काल घरात आई वडिलांची अडचण होते म्हणून त्यांना वृध्दाश्रमात ठेवण्याची फॅशन झाली आहे परंतू ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवले त्या दैवताची वृध्दापकाळात घरात आडचन होते हे लाजिरवाणे असून अशा मूलांना कायद्याची बंधने हवीत ज्या वयात वृद्धांना खरी मदतीची गरज असते त्या वयात वृद्धांना आश्रमामधे ठेवले जाते. भविष्यात महाराष्ट्रतच नव्हे तर देशातील कोणत्याही वृध्दांवर ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा कायदा शासनाने देशभरात करणे आवश्यक असल्याचे सरपंच राहूल केंद्रे यांनी सांगितले.