पुणे I झुंज न्यूज : पोलिस नेहमीच घटनेच्या ठिकाणी उशिरा पोचतात, असा समज असतो. मात्र, येरवडा पोलिसांनी घटनास्थळी तत्परता दाखविल्याने एका रिक्षाचालकाचे प्राण वाचले.
वडगावशेरी चौक येथे महादेव सोनवणे (रा.सुवर्णयुग कॉलनी) या रिक्षा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मेट्रोच्या काम चालू असलेल्या ब्लॉक वर जाऊन रिक्षा धडकली व अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकास जबर दुखापत झाली आहे. तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरात आपल्या कर्त्यव्यावर असलेले येरवडा पोलीस कमर्चारी स्वप्निल मराठे व कपिल चौरे यांनी हि घटना पाहताच अपघात ठिकाणी धाव घेतली. रिक्षाचालकास जबर दुखापत झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरु असल्याचे पाहत कोणताही विलंब न लावता सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. पोलिसांच्या तत्परतेने रिक्षा चालकाचे प्राण वाचल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे.