पुणे I झुंज न्यूज : संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्यातील देहू गावातील सांगुर्डे येथे राहणारा अतुल बबन आढाव हा अभिनेता आता हिंदी चित्रपटात सह कलाकाराची भूमिका निभावत झळकणार आहे. आज पर्यंत अतुलने मराठी शॉर्ट फिल्म, चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवले आहे.
अतुल बबन आढाव सध्या आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे कॉलेज येथे एम. ए. चे शिक्षण घेत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असून वडील बांधकाम कामगार आणि शेतकरी आहेत. आजपर्यंत मामा, मामी आणि भाऊ यांच्या सहकार्याने २०१४ सालापासून कला क्षेत्रामध्ये जिद्दीने व मेहनतीने आपली कला जोपासत आहे.
“अतुल आढाव यांची पहिली शॉर्ट फिल्म देशभक्त, निर्माता संजय चव्हाण व लेखक-दिग्दर्शक सुनील सुतार आवाज मराठी शॉर्ट फिल्म, मराठी फिल्म सुपरहिट मुळशी पॅटर्न फिल्म मध्ये सह कलाकार, गैरी या नवीन फिल्ममध्येहि सह कलाकार म्हणून काम केले आहे. नुकत्याच एका हिंदी चिञपटात शाॅप वेंडर म्हणून सह कलाकाराची भूमिका साकारत हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे
अतुल सांगतो कि, या क्षेत्रामध्ये आणलं ते गुरुवर्य दिग्दर्शक गजेंद्र ढगे सर यांनी. लहानपणापासून कला क्षेत्राची आवड होती. पण घरची परिस्थिती तशी नव्हती. गजेंद्र ढगे यांनी कला क्षेत्रामध्ये पुन्हा येण्यास भाग पडलं. त्यांच्या सहकार्यामुळे आज मी या क्षेत्रात टिकून आहे. स्वप्न खुप मोठी आहेत स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा आहे. त्यासाठी ही एक परीक्षाच आहे. मी कधीही मोठ्या भूमिकांची अपॆक्षा न करता मिळेल ती छोटी छोटी भूमिका साकारत प्रामाणिकपणे आपल्या कलेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत करत राहणार आहे.