पुणे I झुंज न्यूज : एका मराठी चित्रपटाच्या गाण्याचं हांडेवाडी येथील शौर्य वाडा येते चित्रीकरण सुरु असलेबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य कुणाल देशमुख याना माहिती मिळाल्याने सदर चित्रीकरणाच्या जागी अचानकपणे भेट यांनी दिली. यावेळी चित्रीकरणाच्या सेट वर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने चित्रीकरणाच्या परवानगीसाठी दिलेल्या अटींचे व शर्थींचे तंतोतंत पालन करुनच सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळींची वैद्यकीय माहिती घेऊनचं सदर चित्रीकरण केले जात होते. हे पाहून देशमुख यांनी कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील, कार्यकारी निर्माते शिव माने, निर्मिती व्यवस्थापक स्वानंद देव , सहाय्यक व्यवस्थापक रोहित ओव्हाळ आणि डाॅ. विनिल धोत्रे यांच्यासोबत काही कलाकार मंडळी चित्रीकरण करताना दिसून आले. यावेळी कुणाल देशमुख यांना सेटवर प्रवेश करताना ओळखपत्र तपासून स्पाॅट दादाने हातावर सॅनिटायझर दिले. त्यानंतर डाॅ. धोत्रे यांनी तापमान तपासून कोरोनासदृश कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करुनचं संपुर्ण वैद्यकीय चाचणी करुन प्रवेश दिला.
इतर कोणत्याही प्रोडक्शन हाऊसला किंवा कलाकारांना चित्रीकरण करायचे असल्यास या पद्धतीनेच काळजी घेऊन चित्रीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.