मुळशी | झुंज न्यूज : देशभर घराघरामध्ये दिवाळी साजरी होत असताना कातकरी आदिवासी समाजातील लोकांच्या घरामधे आनंदाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून DoRBit Foundation च्या वतीने मोहोळनगर अंबडवेट ता. मुळशी येते मिठाई वाटप करण्यात आले.
हिंजवडी पुणे येथील आयटी अभियंते सेवाभावी वृत्तीने एकत्र येत DoRBit Foundation या स्वयंसेवी संस्थेची स्थापना दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना मदत व्हावी हा संस्थेचा हेतू आहे. शिक्षण, गरिबांसाठी मदत, ग्रंथालय, वाचनालय, स्थापना करणे या क्षेत्रात ही संस्था काम करणार आहे दर आठवड्याला ग्रामीण शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी, संभाषण, विज्ञान प्रदर्शन, नवोपक्रमास वाव देणे असे उपक्रम राबविले जातात.
मोहोळनगर अंबडवेट ता. मुळशी येते ही संस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी व पालक यांचा उन्नतीकरिता कार्य करणार आहे. या वस्ती मध्ये दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आले.
DoRBit Foundation चे सदस्य विपीन श्रीवास्तव यांनी या कामी पुढाकार घेतला. मोहोळनगर शाळेतील शिक्षिका प्रीती टिळेकर – शिंदे व मुख्याध्यापिका मंगल मारणे यांनी समन्वयाचे काम केले. मिलिंद इंगुलकर यांनी DoRBit Foundation संस्थेच्या वतीने समाजातील लोकांना दिवाळी मिठाई वाटप केले. या प्रसंगी मुळशी तालुका पोलिस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनचे मुळशी कार्याध्यक्ष अभिजित जाधव, शंकर भाऊ सुतार (अध्यक्ष वाढेश्वर प्रतिष्ठान ) अतुल सुतार, चेतन सुतार, किरण सुतार, समीर सुतार, दीपक गुरझडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
“DoRBit Foundation च्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती, कंपनीचा सीएसआर फंड यांच्या सौजन्याने दुर्बल घटकांसाठी काम करणार आहेत. पारदर्शी पद्धतीने काम करत या स्वयंसेवी संस्थेकडून गरजू लोकांसाठी जास्तीत जास्त सेवा पुरविण्याचे काम करणार आहे.” – विपीन मोहित श्रीवास्तव ( सदस्य – डोरबीट फौंडेशन)