पिंपरी | झुंज न्यूज : ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील १८ वर्षाखालील १०० मुला-मुलींना नाना काटे सोशल फाऊंडेशन व श्री फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त मुलांच्या मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन क्लॉथ स्टोअर्स मधुन कपडे, व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले.
यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होता.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते विठठ्ल ऊर्फ नाना काटे, आश्रमाचे संस्थापक सागर पाडाळे, साद सामजिक संस्था चे विकास पवार आदी उपस्थित होते.