अतिक्रमण निरीक्षक अरुण सोनकुसरे यांच्यावर पैसे खालल्याचा आरोप ; नाना काटे यांची चौकशीची मागणी
पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कार्यरत अतिक्रमण निरीक्षक अरुण सोनकुसरे यांची या विभागातून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली. यासंदर्भात काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
सोनकुसरे हे अतिक्रमण विभागात कार्यालय अधिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रस्त्याच्या आजुबाजुंवर झळकणा-या फ्लेक्स व होर्डिंग्जवर कारवाई न करण्यासाठी जाहिरातदारांकडून लाच घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
ही बाब अतिशय गंभीर असून सोनकुसरे यांची अतिक्रमण विभागातून तत्काळ बदली करण्यात यावी. जाहिरातदारांकडून खाललेल्या पैशांची, त्यांच्या वैयक्तीक मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.