शिरूर | झुंज न्यूज : सध्याच्या काळामध्ये नोकरी मिळणे कठीण झालेले असून युवकांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांनी व्यक्त केले.
सणसवाडी ता. शिरूर येथे वाजे वडेवाले यांच्या हॉटेलच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटनप्रसंगी बोलताना शेरखान शेख बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की दादा वाजे या युवकाने परिस्थितीवर मात करत उद्योग क्षेत्रात स्वताचे नाव तयार केले असल्याची बाब युवकांना प्रेरणा देणारी असून युवकांनी दादा वाजे या युवकाचा आदर्श घ्यावा असे देखील शेरखान शेख यांनी सांगितले.
सदर मोठ्या औद्योगिक क्षेत्रात हॉटेल सुरु करण्यासाठी माजी उपसरपंच गणेश दरेकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे दादा वाजे यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी उद्योजक दादा वाजे, राजेशशेठ भुजबळ, भरत जगताप, अजय जगताप, विनोद कानडे, अनिल वाजे, आण्णासाहेब मांजरे यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान सदर हॉटेलला जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, भारतीय जनता पार्टीचे गणेश कुटे, अपूर्व पलांडे यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या, तर भरत जगताप, अजय जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.