पुणे I झुंज न्यूज : कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनच्या काळात संजू एन्टरटेन्मेन्ट – संजय यादव प्रायोजित सिनेरामा प्रॉडक्शन इवेंट अँड मिडियाने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही कलाकारांसाठी स्पर्धकांना ऑनलाइन एकपात्री आणि एकेरी नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी दिली होती. आणि यां संधीचा योग्य तो लाभ घेऊन संकटकाळी देखील स्पर्धकांनी स्पर्धेसाठी उतम प्रतिसाद दिला. या ऑनलाइन एकपात्री स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
ऑनलाइन एकपात्री स्पर्धेकच्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – धनिष्ठा काटकर – (सातारा)
द्वितीय क्रमांक – तृप्ती धुरी.
तृतीय क्रमांक – हर्षद चुरी ( पालघर )
उतेजनार्थ – साची नागोटकर, प्रज्ञा साबळे, आर्य तेटाबे ( लालबाग, परळ )
ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धा विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक – श्राव्या मयेकर (जोगेश्वरी )
द्वितीय क्रमांक – श्रुती रत्नपारखे ( ठाणे )
तृतीय क्रमांक – धनिष्ठा काटकर (सातारा)
उतेजनार्थ – अकिल जमादार (पिंपरी, पुणे) , तनिषा मोहिते ( ठाणे )
या स्पर्धकांना रोख बक्षीस आणि बक्षीस पात्र कलाकारांना ” राम माळी सिनेरामा” या यूट्यूब चैनलवर संधी दिली जाणार आहे. या ऑनलाईन एकपात्री स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक, पत्रकार महेश तेटांबे, लेखक साहित्यिक किमंतु ओंबळे यांनी काम पाहिले. ऑनलाईन एकेरी नृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणुन “अग्गं बाई सासू बाई ” या मालिकेतील धामनस्कर बाई आणि “रंग माझा वेगळा” यां मालिकेतील अंजली अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नृत्यदिग्दर्शिका अंजली शिरगांवकर यांनी काम पाहिले.
कोरोना सारख्या विषाणूचे अवघ्या महाराष्ट्रात सावट असताना देखील स्पर्धकांनी आपापल्या परीने योग्य तो सहभाग दर्शविला. त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक अभिनेता व दिग्दर्शक राम माळी यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार मानले.