पिंपरी I झुंज न्यूज : अभूतपूर्व गर्दीने गोविंदा पथकांचा उंचावलेला आत्मविश्वास, डी जे च्या तालावर मनसोक्त दहीहंडी उत्सवाचा आनंद घेणारी सळसळत्या तरुणांच्या उत्साही आणि जल्लोषी वातावरणात चित्तथरारक मानवी मनोरा रचत श्री संदीप वाघेरे युवा मंच आयोजित दहीहंडी चेंबूर येथील सदगुरू साईनाथ गोविंदा पथकाने यंदाची दहीहंडी फोडली. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पिंपरी गावातील संपर्क कार्यालयासमोर मोठमोठ्या बक्षीसांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आले. या दहीहंडीच्या कार्यक्रमांना चित्रपटसृष्टीतील कलाकार हजेरी लावली.
माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. दहीहंडीसाठी मुंबई, ठाणे व पुणे, पिंपरी चिंचवड मधून अनेक गोविंदा पथक या ठिकाणी आले होते. गोविंदा पथकाच्या या देखावा सादरीकरणाला खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे यांच्यासह दहीहंडीप्रेमींनी टाळ्यांचा गजर करत प्रोत्साहन दिले. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ “जय श्रीराम” असा गजरही करण्यात आला. हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी दहीहंडी प्रेमींनी आपले मोबाईलमध्ये टॉर्च लावून साद देताना एकच गर्दी केली होती.
यावेळी संदीप वाघेरे याचे पुत्र राजवीर संदीप वाघेरे यांचा वाढदिवस केक कट करून मोठी आतिषबाजी करून साजरा केला. कंस राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर कृष्ण भगवान रूपात भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी जन्म घेतला. त्या जन्माचा उत्सव म्हणजे आपण गोकुळाष्टमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करतात. अशा गोकुळाष्टमीच्या नगरसेवक संदीप वाघेरे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.