पिंपरी I झुंज न्यूज : दोन दिवसांपूर्वी पिंपरी गावातील नाणेकर कॉम्प्लेक्स जवळ उभ्या असलेल्या वाहनाचे मोकाट जनावरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी गाव परिसरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्यावर दिवसा व रात्री ठाण मांडून बसलेली किंवा उभी असलेली मोकाट जनावरे पादचारी आणि वाहनचालक यांच्यासाठी एक डोकेदुखी बनली आहे.
यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. परिणामी रस्त्यांवरील जनावरांमुळे पादचारीही त्रस्त झाला आहे. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजसेवक सुहास कुदळे यांनी केली आहे.