नवी दिल्ली | झुंज न्यूज : बिहारच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी, लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज ( ८ ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले.
रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. चिराग पासवान लिहितात, पप्पा… तुम्ही या जगात नाहीत. पण, मला माहीत आहे की तुम्ही जिथे आहात सदैव माझ्यासोबत आहात.”
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.
यानंतर देशभरातून त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या जाण्याबद्दल शोकाकूल होत आदरांजली वाहिली आहे .