हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन
कोल्हापूर | झुंज न्यूज : देशात “बेटी पढाओ, बेटी बचाओ” चा नारा दिला जात असताना भाजपची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात “बेटी भगाओ, बेटी जलाओ” सारखी अमानवी कृत्ये घडत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात महिलांवरील अत्याच्यारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचे काम उत्तरप्रदेश सरकार कडून होत आहे. त्यामुळे बलात्कारातील आरोपीना पाठीशी घालणारी बीजेपी म्हणजेच “बेटी जलाओ पार्टी”चे उत्तरप्रदेशातील सरकार बरखास्त करावे, आरोपींना फाशी व्हावी आणि पिडीत दलित युवतीच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली.
हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी “बलात्काऱ्याना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो”, “बरखास्त करा, बरखास्त करा.. उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा”, “राजीनामा द्या, राजीनामा द्या.. योगी आदित्यनाथ राजीनामा द्या”, अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून सोडला. यानंतर *हाथरस प्रकरणातील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेच्या वतीने दहन करण्यात आले.
या वेळी शिवसेना कोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगलताई साळोखे, माजी शहरप्रमुख पूजाताई भोर, मंगलताई कुलकर्णी, रुपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, सुनिता भोपळे, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, फेरीवाले सेना शहरप्रमुख धनाजी दळवी, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अमित चव्हाण, सुनील खोत, अजित गायकवाड, दीपक चव्हाण, राहुल चव्हाण, विभागप्रमुख विक्रम पवार, राजू काझी, कपिल सरनाईक, उदय भोसले, भाई जाधव, माथाडी कामगार सेनेचे शहरप्रमुख राज जाधव, युवा सेना शहर प्रमुख चेतन शिंदे, योगेश चौगले, शैलेश साळोखे, दादू शिंदे, अक्षय कुंभार, सचिन भोळे, निलेश हंकारे, राजू ढाले, सागर घोरपडे, श्रीकांत मंडलिक, गोविंद वैदू, अशोक माने, गणेश वाळवेकर, अंकुश निपाणीकर, अर्जुन आंबी, सुभाष पाटील, कृपालसिंह पुरोहित, संतोष रेवणकर, कपिल केसरकर, अनिकेत राऊत, सचिन पाटील, टिंकू देशपांडे, सचिन क्षीरसागर, विनोद हजारे, रुपेश इंगवले, किरण पाटील, विशाल पाटील, शैलेंद्र गवळी, राकेश माने यांच्या सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.