मुळशी I झुंज न्यूज : २० व्या नॅशनल सिलंबम स्पर्धेत प्रसन्न पप्पू कंधारे याने रौप्यपदक पटकावले आहे. प्रसन्न हा मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातला खेळाडू असून पत्रकार पप्पू कंधारे यांचा चिरंजीव आहे. ही स्पर्धा कन्याकुमारी- तमिळनाडू या ठिकाणी पार पडली.
या स्पर्धेत अनेक राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यातर्फे प्रसन्न कंधारे याची निवड झाली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, पॉंडीचेरी असे सामने खेळून प्रसन्नला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.
प्रसन्न कंधारे यांनी सांगितले की, पुढच्या वेळी अधिकचा सराव करुन सुवर्णपदक मिळवून देईल. आता पर्यंत खेळातील हे पहिलेच रौप्यपदक आहे. खेळ म्हटले की हार-जीत होतच राहते. कुठेतरी मेहनत कमी पडली असे समजून पुढच्या वेळी सुवर्णपदकच महाराष्ट्रासाठी देणार आहे.
सिलंबम खेळासाठी प्रसन्न हा कुंडलिक कचाले सर यांच्याकडे सराव करत आहे. पुढील वाटचालीसाठी कोंढावळे तसेच मुळशीतील नागरिकांकडून प्रसन्नला शुभेच्छा देण्यात येत आहे.