भोसरी I झुंज न्यूज : भोसरी येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वन अधिकारी कै. विश्वास कृष्णाजी वाळके. (वय वर्षे ८० ) यांचे दिं. ७/३/२०२४ रोजी सकाळी वृद्धापकाळाने भोसरी येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर निवडणूक प्रभारी अशोक वाळके यांचे ते मोठे बंधू होत.
विश्वास वाळके यांनी वनअधिकारी म्हणून नोकरी केली. देशामध्ये वाघ पाळणारे ते एकमेव वन अधिकारी होते.