पिंपरी I झुंज न्यूज : पिंपरी चिंचवड शहर लॉन्ड्री संघटनेच्या अंतर्गत पिंपळे सौदागर रहाटणी विभागाची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्ष सुनील पवार व कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर हनुमान मंदिर येथे मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना भाई विशाल जाधव म्हणाले की लॉन्ड्री संघटनेच्या सभासदांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास, त्यांनी संघटनेला रीतसर पत्र व्यवहार केल्यास त्या लॉन्ड्री धारकांची अडचण सोडवण्यात येईल. लॉन्ड्री व्यवसाय चालकाने एकाच दरात व्यवसाय करावा. संघटनेचे नियमाचे व शर्तीचे प्रत्येकाने पालन करावे ,अन्यथा संघटनेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
लॉन्ड्री संघटनेमार्फत वर्षातून तीन सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते, त्यामध्ये महापुरुषांची संयुक्त जयंती ,समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार सोहळा, पिंपरी चिंचवड शहर महापुरुषांचे पुतळे व मंदिरांची साफसफाई करणे ,असे उपक्रम संघटनेमार्फत राबविले जातात. नवीन कार्यकारणीतील पदाधिकारी यांचे अभिनंदन व शुभेच्छा आपण सर्वांनी अधिक ताकतीने संघटन मजबूत करावे असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
निवड झालेली कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष: शुभम तवर, उपाध्यक्ष: परमेश्वर पैठणकर , खजिनदार: विक्रम जाधव , सचिव :स्वप्निल इंगोले , कार्यकारणी सदस्य: सागर राठोड, संतोष परीट, राजकुमार कनोजिया, अमोल मोरे, संतोष सौदागर, दत्ता सौदागर , ज्ञानेश्वर मुळे, सुशील काटे , सुरज राक्षे, संतोष गोतावळे, बबलू खान