पिंपरी I झुंज न्यूज : सामाजिक भेदभाव, रुढी, परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी संत रविदास महाराज यांनी महत्वपुर्ण कार्य करून सामाजिक एकोप्याचा संदेश सर्वांना दिला. संपुर्ण भारतात फिरून त्यांनी समाजप्रबोधन केले. प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी काव्यांची रचना केली. त्यांच्या भजनांनी इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य केले. त्यांचे व्यापक विचार घराघरात पोहोचावेत यासाठी भावी पिढीने वारसा जोपासला पाहिजे असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी नगरसदस्य तानाजी खाडे, भिमा बोबडे, राजु बनसोडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता अभिमान भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे,प्रल्हाद कांबळे, तेजस्विनी कदम, सुदाम कांबळे, सचिन लाड, नाना राऊत, कोमल शिंदे, रामेश्वर पाचारे, मारूती वाघमारे, अतुल कदम, शंकर निकम, किशोर साळुंके, प्रा. नितीन साळी, बाबासाहेब पोळ, राजहंस पाचंगे, सुनिल कदम, नंदकुमार कांबळे, सविता सोनवणे, वंदना वाघमारे, संतोष वाघमारे, दत्तात्रय कांबळे यांसह मोठ्या संख्येने महापालिकेतील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
संत रविदास महाराज यांना संत रोहिदास महाराज या नावानेही ओळखले जाते. ‘मन चंगा तो कठौती में गंगा’ यासह त्यांचे अनेक दोहे प्रसिद्ध आहेत. त्यांनी आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यांसह भारतभर फिरून केलेल्या समाजप्रबोधनाच्या महत्वपुर्ण कार्यामुळे त्यांना सर्वत्र ओळखले जाते. विचारांची श्रेष्ठता, समाजाच्या कल्याणासाठी प्रेरित झालेले कार्य आणि चांगले आचरण हे गुण माणसाला महान बनविण्यासाठी मदत करतात, याचा प्रत्यय संत रविदास महाराज यांच्या जीवनशैलीतून दिसून येतो.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.