शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी गौरवले बावधनचे पेरीविंकल स्कूल…
मुळशी I झुंज न्यूज : कमिन्स इंडिया फाऊंडेशन, मिशन सिटी चक्र, जनवाणी व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथील जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पेरिविंकलच्या इयत्ता आठवीची विद्यार्थिनी रतीश्री अग्रवाल हिने या स्पर्धेत पुणे महानगरातील इतरांना मात देत प्रथम क्रमांक पटकावला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, फाऊंडर आणि ग्रुप चेरमन KPIT Technologies डॉ. रवि पंडित, गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे आदी प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांना लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या मनामध्ये प्लास्टिकविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी कमिन्स इंडिया फाउंडेशन, पुणेतर्फे महानगरपालिका स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झालेल्या सत्काराबद्दल आणि असे उत्तुंग यश संपादित केल्याबद्दल चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संचालक अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल सर यांनी तिला शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले. हे यश संपादित करण्यासाठी रतिश्री अग्रवाल हिला शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कोल्हे, शिक्षिका व पालकांचे मार्गदर्शन लाभले.